Sant Gadagebaba (संत गाडगेबाबा)

250

Availability: 100 in stock

SKU: 9789394266421 Category:

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अखेरचे संत म्हणून ज्यांचे नाव इतिहासात कोरले गेले, ते म्हणजे संत गाडगेबाबा ! बाबांनी आपले संपूर्ण जीवन लोकांची सेवा करण्यामध्ये घालवले. त्यासाठी त्यांनी आपले घर-प्रपंचाचा त्याग केला. हातात खराटा घेऊन परिसराची स्वच्छता तर केलीच, सोबतच कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकीही साफ केली. त्यांनी लोकांच्या डोक्यातील देवभोळेपणा, अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा, अज्ञान, व्यसनाधिनता तर दूर केली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वतः मागून मिळेल तो भाकरीचा तुकडा खाल्ला, मात्र अंध-पंगु, गरिब, भिकारी, कुष्ठरोगी यांच्यासाठी जेवणाच्या पंगती सुरू केल्या. स्वतः आयुष्यभर झोपडीत राहिले, मात्र महाराष्ट्रभर अनेक धर्मशाळा उघडल्या. कुठलेही भौतिक सुख, आर्थिक मोह, प्रतिष्ठा त्यांना शिवू शकली नाही. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
प्रबोधनकार ठाकरे हे गाडगेबाबांचे समकालीन होते, त्यांना बाबांचा बराच सहवास लाभला. त्या सहवासात त्यांना पहायला मिळालेले, त्यांना समजलेले गाडगेबाबा त्यांनी या चरित्राच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले आहेत. गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय होण्याच्या दृष्टीने हे चरित्र छोटेखानी असले, तरी प्रबोधनकरांनी आपल्या लेखनशैलीने त्याला सर्वसमावेशक बनवले आहे.
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला !

Number of Pages

184

Writer

Prabodhankar Keshav Seetaram Thakare

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us