Inuchi Goshta (ईनुची गोष्ट)

350

एका मजुरी करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या युनुसचा संघर्ष हा आधीच काही कमी नव्हता. वेटर, सेल्समन, सिक्युरिटी गार्ड मिळेल ते काम करत, तो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत अन् सोबत अधिकारी होण्याचं स्वप्नही बाळगून होता. अशात त्याच्या आयुष्यात नियतीने कॅन्सररुपी घाला घातला. आता इनु मरणार या विचाराने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पण आपल्या इनुकडे लढण्याची अन् आईला सुखाचे दिवस दाखविण्याची उमेदच निराळी होती. आईच्या चेहऱ्याकडे आणि संघर्षाकडे पाहून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. आर्थिक तसेच बाकीच्या असंख्य अडचणी, त्यात अनेक असाध्य रोग एकाच वेळी त्याला झाले, अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचूनही अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा चंग बांधलेल्या इनुने हिंमतीने कॅन्सरवर मात केली. त्याची ही मात फक्त असाध्य आजार झालेल्यांनाच नाही तर माझ्यासारख्या अनेकांना आयुष्याकडे बघण्याची नवीन उमेद आणि दृष्टी तर देतेच पण कोणत्याही परिस्थितीशी लढणाऱ्या प्रत्येकाने स्वानुभव असलेली ‘इनुची गोष्ट’ वाचावी आणि अंर्तमनात सांगवं की संघर्ष मान्य आहे “कारण अजून मी जिंवत आहे…”

Weight 300 g
Dimensions 21 × 14 × 3 cm
Writer

Yunus Sayyad

Number of Pages

270

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us