Debu Te Gadagebaba (डेबू ते गाडगेबाबा)

200

Availability: 100 in stock

योगी आणि वैरागी हे दोन्ही भाव संत गाडगेबाबांमध्ये दिसतात. त्यांचे पुरोगामी विचार आजही समाजाला दिशादर्शक आहेत. आपण विद्यापीठास त्यांचे नाव दिले खरे, पण त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले? हा शोध महत्त्वाचा ! त्यांचे विचार माणसांच्या मस्तकात शिरणे गरजेचे आहे.
गाडगेबाबा नावाचे चालते बोलते विद्यापीठ कधीच कुठल्या चौकटीत बंदिस्त होऊ शकत नाही. त्यांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांचा रोकडा धर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लोक देवाच्या श्रध्देने एकत्र जमतात, भक्तीत तल्लीन होतात. त्यांच्या या श्रद्धेचा उपयोग अंधश्रद्धा, अन्याय आणि शोषण दूर करण्यासाठी करून घेण्याचा व्यवहारी विचार सामाजिक क्षेत्रात गाडगेबाबा आणि महात्मा गांधी या दोघांनीच केलेला पहायला मिळतो.

Shopping Cart
× WhatsApp Us