या कथांमध्ये गिरणगावाच्या उत्कर्षकालाचं वर्णन नाही; ऱ्हासकाळाचं आहे. गिरण्या आणि गिरण्यांमधला रोजगार संपून गेला आहे आणि तरीही बुडण्याच्या अगोदर जिवाच्या एकांताने काडीचा आधार शोधत कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न हा समाज करू पाहतो आहे. पण प्रातिनिधिक पात्रांच्या माध्यमातून एक सरसकट सामाजिक विधान करण्याऐवजी लेखक या समाजाच्या पोटात शिरतो आणि पूर्ण समरस होणाऱ्या दृष्टीद्वारे वाचकाला एका स्वायत्त जगाची आतून सफर घडवून आणतो ते जीवन जगणं म्हणजे काय, ह्याची नकळत जाणीव करून देतो. यातला निवेदक कथाविश्वाकडे ‘बाहेरून’ बघत नाही; तो त्या विश्वाचा एक भाग आहे. नव्हे, तोसुद्धा कथांमधलं जणू एक पात्र आहे. यामुळे तो त्या विश्वाशी आणि त्या काळाशी समरस झाला आहे. त्याची वर्णनशैली सहज आहे. सहजतेच्या ओघात कधी तो माणसांबद्दल, जगण्याबद्दल, संस्कृतीबद्दल मूल्यविधान करतो; पण त्याला लेखकाने केलेले निर्णयविधान मानण्याचं कारण नाही. वाचताना समोर येतं, ते एक जीवनदर्शन. त्यातून कोणते निकष लावून कसल्या निष्कर्षाचं नवनीत बाहेर काढायचं, हे पूर्णपणे वाचकाचं काम.
Fiction History
Chinchpokali (चिंचपोकळी)
₹350
Availability: 100 in stock
Category: Fiction History
Tags: Ainapure, Chinchpokali, G. K. Ainapure, चिंचपोकळी
Weight | 300 g |
---|---|
Dimensions | 21 × 14 × 3 cm |
Writer | G. K. Ainapure |
Number of Pages | 280 |
Related products
-
Avani T1 (अवनी T1)
₹250