इच्छामरण – प्रकाशन सोहळा
‘इच्छामरण’ या संगीता लोटे लिखित सत्यकथनात्मक पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक संजय सोनवणी यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय क्षेत्रातील अनैतिकतेवर चिंता व्यक्त करत त्यांनी इच्छामरणाला मान्यता देण्याची गरज मांडली. या पुस्तकात जीवनातील अनुभव साहित्यसौंदर्याने मांडले आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोथरूडमधील या कार्यक्रमाला हनुमंत कुबडे, चंद्रकांत जोशी, अमृता तांदळे, संभाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक अमृता तांदळे तर सूत्रसंचालन पूनम अहिरे यांनी केले.