
मराठी साहित्यविश्वात नवनिर्मिती आणि परिवर्तनाची बीजे रोवण्याचे उद्दिष्ट नजरे समोर ठेवून २०१७ साली उदयास आलेली प्रकाशन संस्था म्हणजे न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस ..!
पदार्पणाच्या केवळ चारच वर्षां मध्ये मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे.
आजवर विविध धाटणीतल्या तब्बल नऊ दर्जेदार साहित्य कृती प्रकाशित करून महाराष्ट्रातील नव्या दमाच्या लेखकांना प्रकाशन संस्थेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
भविष्यातही, केवळ जास्तीत जास्त गुणवत्ता पूर्ण साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याला जागतिक पातळीवर सिद्ध करण्याचा मानस ठेवून ‘न्यु ईरा पब्लिशिंग हाऊस ‘ मार्गक्रमण करत आहे.

न्यू इरा पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था २०१७ साली मराठी साहित्यविश्वात नवनिर्मिती आणि परिवर्तनाची बीजे रोवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून उदयास आली.
आजवर विविध धाटणीतल्या दर्जेदार साहित्य कृती प्रकाशित करून महाराष्ट्रातील नव्या दमाच्या लेखकांना प्रकाशन संस्थेने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस हे पदार्पणाच्या केवळ चारच वर्षांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले आहे.
नव उदयोन्मुख लेखकांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस नेहमीच प्रयत्नशील आहे.
भविष्यातही केवळ जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा मानस ठेवून ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ मार्गक्रमण करत आहे.इरा

रावण पुस्तकाची ६०,००० पेक्षा जास्त विक्री. रावण हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध

नव्या युवा लेखकांना प्राधान्य देणारे हक्काचे व्यासपीठ

प्रतिपश्चंद्र' पुस्तक लवकरच येणार web series स्वरूपात

पुस्तक वाचकाला' लेखकाच्या नावाने पुरस्कार देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रकाशन

रावण आणि आंत्रप्रेन्यूअर या Bestseller पुस्तकांचे 1 लाख पेक्षा जास्त विक्रमी विक्री

नव्या युवा लेखकांना प्राधान्य देणारे हक्काचे व्यासपीठ

रावण आणि आंत्रप्रेन्यूअर ही पुस्तके मराठी , हिन्दी इंग्लिश सोबतच आता कन्नड , मल्याळम , तमिळ , तेलुगू भाषेतही लवकरच उपलब्ध होणार

पुस्तक वाचकाला लेखकाच्या नावाने पुरस्कार देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रकाशन
Our Vision
मराठी साहित्याला पूर्वापार चालत आलेला समृद्ध आणि दैदीप्यमान असा वारसा लाभलेला आहे.
मराठी साहित्य क्षेत्रावर जीवापाड प्रेम करणारे वाचकही अगणित आहेत. या वाचकांमुळेच मराठी भाषा, साहित्य व संस्कृती ही काळनुरूप अधिकाधिक समृद्ध होत गेलेली आहे. वाचकांच्या याच प्रेमामुळे आणि संवेदनशीलतेमुळे काळाने हिरावलेली अनेक लेखक मंडळी आजही वाचकांच्या मनात आणि गप्पांमध्ये जिवंत आहेत.
एक प्रकाशन संस्था म्हणून न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने मराठी वाचकांचे हे प्रेम ओळखून मराठी वाचकांना उत्तमोत्तम असं साहित्य प्रकाशित करून देण्याचा संकल्प केला आहे. त्याचप्रमाणे लिखाण आणि वाचन या अभिव्यक्तींना ठराविक चौकटीपुरतं फक्त सुशिक्षित आणि शहरी अशा मर्यादेत न ठेवता अमर्यादित आणि या शहरी अथवा प्रमाण भाषेच्या विश्वापासून प्रचंड दूर असलेल्या ग्रामीण भागापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे.
मोठ मोठी नफ्या-तोट्याची गणितं करणाऱ्या प्रकाशन संस्था साहित्य संस्कृतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहत असताना नवख्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करण्यास कचरतात. अशावेळी केवळ व्यावसायिक विचार न करता नवख्या लेखकांच्या दर्जेदार लिखाणाला प्रकाशित करून साहित्य संस्कृतीला हुरूप देण्याचे कार्य न्यू ईरा प्रकाशन संस्था करत आहे.
महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आपले विविधांगी जीवन लेखणीतून मांडणाऱ्या लेखकांना न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ ठरेल अशी आशा वाटते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष वाचनावर बराच परिणाम झाला आहे, पण आता पुन्हा नव्याने सर्वांना वाचनाचे महत्व कळत आहे आणि वाचन संस्कृती पुन्हा नव्याने भरारी घेत आहे. या धर्तीवर न्यू ईरा प्रकाशन संस्था असे दर्जेदार साहित्य फक्त प्रकाशित न करता वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सदैव कटिबद्ध आहे.
महाराष्ट्रात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली पुस्तके मराठीत भाषांतरीत करून मराठी वाचकांची मने जिंकली, परंतु आजवर मराठीतील एकही दर्जेदार साहित्य भाषेच्या आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून प्रसिद्ध होऊ शकलेलं नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस तयारीनिशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरत आहे. मराठी साहित्य आणि लेखक जगाच्या पाठीवर प्रसिद्ध व्हावेत हा एकमेव मानस ठेऊन प्रकाशन संस्था भविष्यात मार्गक्रमण करेल.
Our Vision
मराठी साहित्याला पूर्वापार चालत आलेला समृद्ध वारसा आहे.
मराठी साहित्य सृष्टीला जीवापाड प्रेम करणारे वाचक मिळाले आहेत. एखादा प्रसिद्ध अभिनेता जसा त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो तसंच काहीसं मराठी लेखकांच्या बाबतीत आहे. मराठी वाचक आपल्या आवडत्या लेखकाला कायम डोक्यावर घेतात. काळाने हिरावलेली अनेक लेखक मंडळी वाचकांच्या मनात आणि गप्पांमध्ये आजही जिवंत आहेत.
एक प्रकाशन संस्था म्हणून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसने मराठी वाचकांचे हे प्रेम ओळखून मराठी वाचकांना उत्तमोत्तम असं साहित्य प्रकाशित करून देण्याचा संकल्प केला आहे. त्याचप्रमाणे लिखाण आणि वाचन या अभिव्यक्तींना ठराविक चौकटीपुरतं फक्त सुशिक्षित आणि शहरी अशा मर्यादेत न ठेवता अमर्यादित आणि या विश्वापासून प्रचंड दूर असलेल्या ग्रामीण भागापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे.
मोठ मोठी नफ्या-तोट्याची गणितं करणाऱ्या प्रकाशन संस्था साहित्य संस्कृतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहत असताना नवख्या लेखकांचे साहित्य प्रकाशित करण्यास कचरतात. अशावेळी केवळ व्यावसायिक विचार न करता नवख्या लेखकांच्या दर्जेदार लिखाणाला प्रकाशित करून साहित्य संस्कृतीला हुरूप देण्याचे कार्य प्रकाशन संस्था करत आहे.
महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आपले विविधांगी जीवनलेखणीतून मांडणाऱ्या लेखकांना न्यू इरा पब्लिशिंग हाऊस म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ ठरेल अशी आशा वाटते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रत्यक्ष वाचनावर बराच परिणाम झाला आहे पण आता पुन्हा नव्याने सर्वांना वाचनाचे महत्व कळत आहे आणि वाचन संस्कृती पुन्हा नव्याने भरारी घेत आहे. या धर्तीवर न्यू इरा प्रकाशन संस्था असे दर्जेदार साहित्य फक्त प्रकाशित न करता वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सदैव कटिबद्ध आहे.
महाराष्ट्रात अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली पुस्तके मराठीत भाषांतरीत करून मराठी वाचकांची मने जिंकली परंतु आजवर मराठीतील एकही दर्जेदार साहित्य भाषेच्या आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून प्रसिद्ध होऊ शकलेलं नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी न्यु एरा पब्लिशिंग हाऊस तयारीनिशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरत आहे. मराठी साहित्य आणिलेखक जगाच्या पाठीवर प्रसिद्ध व्हावेत हा एकमेव मानस ठेऊन प्रकाशन संस्था भविष्यात मार्गक्रमण करेल.