माझे नाव मोईन काबरा/Moin Humanist आहे.मी सध्या 24 वर्षाचा असून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर या गावाचा रहिवासी आहे.मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातुन येतो.माझ्या कुटुंबात आई,वडील,मी आणि एक छोटा भाऊ असे एकूण आम्ही 4 सदस्य आहोत..आई गृहिणी असून वडील व्यवसायिक आहेत.तर मी आणि माझा लहान भाऊ सध्या शिक्षण घेतोय.

मी सध्या नुकतंच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन पदवीधर झालो आहे.तर आता पुढील उच्चशिक्षणासाठी तयारी करतोय.

बी.ए च्या द्वितीय वर्षांत असताना मी यूपीएससी तर्फे घेण्यात येणाऱ्या CSE साठी तयारी सुरू केली असून मी सध्या याच परीक्षेची तयारी करतोय आणि लवकरच माझा फर्स्ट Attempt देणार आहे.CSE ची तयारी करत असतानाच मी मागच्या वर्षी पासून व्यवसायात सुद्धा पर्दापण केलं असून मी माझी स्वतःची एक किराणा दुकान चालवत असतो.व सोबत शिक्षण घेतोय..यासोबतच मी वाचकांना सवलतीत पुस्तके घरपोच कुठलाही पाठवण्याचा खर्च न घेता पाठवण्यासाठी We Read हा उपक्रम गावातून चालवत असतो.या उपक्रमातुन मी आजपर्यंत शेकडो वाचकांना पुस्तके पोहोचवली आहेत.

वाचन,लिखाण,चित्रपट,सायकलिंग,संगीत ऐकणे,फोटोग्राफी,नवीन मित्र बनवणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी भटकंतीची खूप आवड आहे.यातून अवांतर वाचन हा माझा खूप आवडता छंद आहे.वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके खरेदी करून संग्रही करणे व ती वाचून काढणे हे मला प्रचंड आवडते..मी आजपर्यंत असंख्य पुस्तके वाचलेली असून पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडलेलं आहे.पुस्तकांनीच मला घडवलं आहे.योग्य त्या वेळेत माझ्या आयुष्यात पुस्तकांचे आगमन नसते झाले तर मी आज घडू शकलो नसतो किंवा उच्चशिक्षित झालो नसतो.इयत्ता 7 वी पासूनच मी अवांतर वाचायला सुरुवात केली होती.आणि आता ही वाचनाची आवड एक माझं एक व्यसन बनली आहे.माझ्या या वाचन प्रेमाला बघून प्रसिद्ध उद्योजक आणि लेखक शरद तांदळे सरांनी मला 2022 साली दिला जाणारा पहिलाच स्वप्नील कोलते पाटील साहित्य पुरस्कार देऊन माझ्या वाचनाचा सन्मान केला आहे.ही आतापर्यंत ची माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी उपलब्धी असून.या सन्माने मला अजून कितीतरी पटीने वाचनाची प्रेरणा मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us