न्यू एरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित आणि “डॉ. संजीव कुलकर्णी” लिखित ‘शटरस्पीड’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, दि. ९ जून २०२६ सायं. ५ : ३० वा. व. ह. तथा नानासाहेब तुळपुले हॉल, क्लब हाऊस बिल्डिंग, डेक्कन जिमखाना, पुणे. येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हिंदी चित्रपटांच्या काही परिचित आणि काही अनवट पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन हिंदी चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि लेखक “हेमंत देसाई” (बाबू मोशाय) तसेच चित्रपट अभ्यासक “उदय ओक” यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “पल्लवी गोरे” यांनी केले. उपस्थित साहित्यप्रेमी, चित्रपट अभ्यासक आणि वाचकांनी पुस्तकाचे उत्स्फूर्त स्वागत करत लेखकाच्या या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे कौतुक केले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंचा वेध घेणारे ‘शटरस्पीड’ हे पुस्तक चित्रपटप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

