(govt officer)

नेटफ्लिक्सची “ताजमहल 1989” ही ऐंशीच्या दशकातली चार कपल्सची छोटी पण खूप निखळ कथा आहे. अजून बहुतांशी माणसं साधी अन जग भाबडे असण्याचा काळ होता तो ; नव्या जगाच्या छटा दिसायला लागल्याचा काळपण म्हणू शकतो.

यात सरिता आणि अख्तर बेग हे प्राध्यापक कपल आहे .सरिता म्हणजे नट्टापट्टा करून येणाऱ्या मुलींना शिस्त लावू पाहणाऱ्या टिपिकल शिक्षकांसारखी आहे .हिने 22 वर्षे संसार केला आहे खरा सध्या ती नात्यातला फोलपणा अधोरेखित होतो अश्या आयुष्याच्या वळणावर ती सध्या आहे. “It’s not Lack of Love But It’s Lack of Friendship that makes Marriage Unhappy” असं वळण म्हणूया हवं तर !

अख्तर बेग युनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफी शिकवतात.उर्दू त्यांचं पहिलं प्रेम आहे. ते डबल ग्रॅज्युएट आहेत म्हणूनच यांचे जोकस् खूप अवघड असतात आणि सामान्याना कळत नाहीत …आणी असं सामान्य लोकांनाच वाटत बरं का !

त्यांचा सुधाकर हा कॉलेजचा बिछडा दोस्त एका मुशायरा मध्ये भेटतो . हे सुधाकर अजब रसायन आहे. जगणं आणि प्रेम या माणसाला कळलंय अस आपण म्हणू शकतो. फिलॉसॉफी शिकून गोल्ड मेडल मिळवून सुद्धा उपजीविकेसाठी छोटं टपरीवजा शिलाईकामाच दुकानं हे सुधाकर चालवतात. मिडल क्लास माणूस गरिबीत देखील प्रामाणिकपणा अफोर्ड करतो ह्या लेव्हलच निरीक्षण अक्षरशः त्यांच्या खूप संवादात मला स्ट्राईक झालं. तो फक्त गोल्ड मेडल जिंकण्यासाठी फिलॉसॉफी शिकला नाही तर त्याच जगणंच फिलॉसॉफी आहे ; हे खूप आदर्शवत वाटू शकतं पण आहे हे असं आहे .त्यांची बायको मुमताज हे पात्र सर्वार्थाने खूप खूप विचार करायला लावणार आहे .अजून अंगद ,रश्मी ,ममता,शालीन ही पात्र कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. स्टीव्ह ,शोनटू सारखी थोडा वेळ सीन मध्ये येणारी पात्र देखील मजेदार आहेत. सरिताला हलके फुलके आणि मनोरंजनपर चित्रपट खूप आवडतात ज्याचा बेग साहेबांना खूप-खूप तिटकारा आहे ! त्यांचं तर म्हणणं आहे की हे मूव्ही नुसते पाहतानाच नाही तर बनवताना पण डोकं घरी ठेवता येऊ शकतं .यावर मग सुधाकर मध्यम मार्ग सांगतात तो असा “You should not Let Intelligence to Spoil Mindless film”

एकंदरीत सगळे जोक्स अतिशय उच्च दर्जाचे आहेत. ( काही सन्माननीय अपवाद वगलता) सगळीच गाणी खूप अफलातून आहेत. “जहाँ सिर्फ तुम हो और जहा खो जाए |मेरे रेहनेक पता वहा हो जाये ||” हे असलं लिरिक्स भिडत लिटरली ! उर्दूचा गंध असणारे सगळे सिरीज जास्त एन्जॉय करू शकतात (माझं ज्ञान तोकड आहे इकडं !)

अब के हम बिछड़े की शायद ख्वाबो मे मिले | जैसे सूखे हुये फुल किताबों मे मिले || कसं सुचतं असेल ना सगळं. शेवटी सगळी पात्र वेगवेगळ्या कारणांनी ताजमहाला पोहचतात तिकडे काय काय होतं हे सगळं स्वतः अनुभवा. मानवी मनाच्या जगण्याच्या अनेक छटांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवट खूप विचार करायला लावणारा आहे ; सगळ्या कपल्सची प्रेमाची व्याख्या सांगणारा आहे रादर. “कळता जराच वाटे कळलेच सर्व काही ; कळल्यावरीच कळते हे एवढेच नाही.”

सुधाकर म्हणतो तसं “आपण माणसं काही तरी बनायच्या नादात सगळं आयुष्य व्यर्थ घालवतो . सारखं काही तरी बनायचा प्रयत्न करतो.” यातून कोणीच सुटत नाही आणि कोणालाच हे सुटत नाही. याच सोल्युशन माझं मलाच काही वर्षांपूर्वी एक कविता खूप आवडली होती त्यात आहे असं वाटत !

“सुंदर आहे असेच असणे ; काही बनणे नाही ,
बीज वाढले किती पाहण्या ; उगाच खणणे नाही “
सुधाकर सांगतो तसं flavorfully जगायचा प्रयत्न तरी करू !
~ भक्ती काळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us