निर्मला आपल्याच तंद्रित अंगात आल्यासारखी घुमत होती. तिचे केस सुटलेले होते. डोळ्यांच्या बाहुल्या वर जाऊन डोळे पांढरेफटक दिसत होते. ती ज्याची आराधना करत होती तो ‘वायंगी’ त्या गुहेच्या जवळपास पोचला होता. तो निर्मलाला जे हवं ते मिळवून देणार होता. त्या मोबदल्यात तो तिच्याकडून स्वतःसाठी भक्ष्य मिळवणार होता. भक्ष्य मिळवणं ‘वायंगी’ साठी मोठी गोष्ट नव्हती, परंतु त्याला मानवजात भ्रष्ट करायची होती. माणुसकीला हरताना त्याला पाहायचे होते. माणूस माणसाचा शत्रू होऊन कितपत मजल मारू शकतो हेच पाहण्यासाठी तो हजारो वर्षे जंगलात वास्तव्य करून राहत होता. एखाद्या लोभी मनाच्या व्यक्तीला स्वतःच्या नादाला लावून त्याच्याकडूनच इतरांचे नुकसान करण्यात त्याला असुरी आनंद व्हायचा. तो असुरांचाच वंशज होता. कलियुगातील कली राक्षसाचा मुलगा ‘वायंगी’.
Related products
-
Eklavya (एकलव्य)
₹380 -
Hindutva (हिंदुत्व)
₹300