,

Digital Yug (AI 2025 ++) (डिजिटल युग)

200

Categories: ,

तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतील. यंत्रमानव आणि मानव ह्यामधील दरी कमी होऊन येत्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल. ह्या क्षेत्रातील सतत बदलणारे तंत्रज्ञान आपल्या जगण्याच्या कल्पनाच बदलून टाकेल. बदलांचा हा वेग येत्या पाच-दहा वर्षांत अधिकच वाढणार आहे. तो सर्वव्यापी तर होईलच पण ज्या पैलूंमध्ये बदल दिसण्याची आपण कल्पनाही केली नव्हती अशा ठिकाणी तो आढळेल. आपले वैयक्तिक जीवन, व्यवसाय, व्यवहार, सामाजिक संपर्क ह्या सर्वबाबी आमूलाग्र बदलणार आहेत.
आपले जीवन कळत-नकळत हे ‘डिजिटल ++’ होत आहे आणि २०३० नंतर त्याची व्याप्ती खूपच वाढेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचे विश्व आता मानवी भावनात्मक रूपही धारण करण्याच्या वाटेवर आहे. इमोटिव्ह रोबोटिक्स ही विद्याशाखा वेगाने प्रगती करत आहे. आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञानाचा असेल. ही वस्तुस्थिती ओळखून तंत्रस्नेही व्हा, स्मार्ट यूजर बना. मात्र स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा. आगामी काळात अनेक ठिकाणी मानवी हस्तक्षेपाची गरज AI साधनेपूर्ण करतील. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची भीती व असुरक्षितता न बाळगता, नव्या तंत्रांशी मैत्री करा, स्मार्ट यूजर व्हा. काळ कोणासाठी थांबत नाही. त्याची पावले ओळखून त्यानुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगच टिकतील. अनेक पारंपरिक रोजगारांवर गदा येईल, पण AI क्षेत्रात नवे रोजगारही निर्माण होतील.

Weight 300 g
Dimensions 21 × 14 × 3 cm
Writer

Dr. Deepak Shikarpur

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us