बाप होण्याची घटना या जगातल्या तोंड द्यायला अवघड घटनांपैकी एक आहे. आपला बाप कसा होता, आहे याचं स्मरणरंजन आणि आपलं बाप होण्यादरम्यान झालेलं परिवर्तन लिहू न सांगणं हे ही तितकच अवघड. बाप आणि शिल्लक हा कवितासंग्रह हे आव्हान पेलण्याच्या क्रियेचा दस्तावेज आहे. मध्यमवर्गीय, स्थलांतरीत गटाच्या बाप बनण्याच्या या प्रक्रियेचा एक पट या संग्रहात येतो. आपल्या आधीच्या, समकालीन आणि येणाऱ्या पिढीच्या सुखदःखाचा, सामाजिक जाणीवांचा, प्रतिकांचा, भावनिकतेचा दस्तावेज म्हणून या संग्रहाचं महत्व आहे