तेजस्विनी पाटील
तेजस्विनी पाटील मॅडम न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस मध्ये 2022 पासून काम करत आहे , त्यांनी ENTC इंजीनीरिंग मध्ये पदवी घेतली आहे. पुस्तकांचा आणि वाचनाचा प्रवास त्यांना शालेय जीवनापासून होता. तोच प्रवास त्यांना प्रकाशन संस्थेपर्यंत घेऊन आला.
न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस मध्ये त्या डिजिटल मार्केटिंगचे काम बघतात. गेल्या काही वर्षात social media मार्केटिंग मध्ये न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर राहिले आहे , त्याचे काम बघण्यात तेजस्विनी मॅडमचा खारीचा वाटा आहे.
चांगल्या ठिकाणी काम करण्याचे समाधान त्यांना मिळत असल्याचे त्या सांगतात. शरद तांदळे सर आणि अमृता मॅडम यांच्या सहवासात राहून अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि ज्ञानात भर पडत आहे, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव आहे,आणि हा अनुभव पुढे देखील खूप कामाचा ठरणार आहे असे तेजस्विनी मॅडम यांना वाटते.
” पुस्तके माणसांना रद्दी होण्यापासून वाचवतात असे म्हणतात ते मी इथे आल्या पासून अनुभवत आहे, चांगल्या लेखकांच्या संपर्कात येवून, त्यांचे पुस्तके वाचून नक्कीच मला प्रेरणा मिळत आहे ” असे तेजस्विनी मॅडम यांचे मत आहे.