श्वेता गायकवाड

जेंव्हा स्वतःवर कुठली जबाबदारी पडते तेंव्हा काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि त्याच दरम्यान स्वतःशीच जास्त संवाद होऊ लागतात असे म्हणणाऱ्या ‘श्वेता गायकवाड’ ह्या २०२० पासून न्यू ईरा टीमचा महत्वाचा भाग आहे.

शिक्षण चालू असतांना आपली जबाबदारी लक्षात घेता इतर क्षेत्रांमध्येही अनुभव घेण्याचे त्यांनी ठरवले. एक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला नोकरी करणं म्हणजे कंप्युटर विषयी ज्ञान तर हवेच, म्हणून कंप्युटर संबंधित शिक्षण घेत असताना तिथेच त्यांना ‘Lab assistant’ म्हणून मुलांना MS-CIT, ADV EXCEL, TALLY विषयी शिकवण्याची संधी मिळाली, तेथील पहिल्या पगाराने कंप्युटर कोर्सची फी त्यांनी भरली. तिथे काम असतांना मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होत गेली , आणखी नवनवीन संधीच्या शोधात ३-४ ठिकाणी कामाचा एक वेगळा अनुभव घेऊन ‘इनोव्हेशन इंजिनिअर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स’ या कंपनीमध्ये ‘Accountant’ म्हणून नोकरी पक्की झाली.

इनोव्हेशनमध्ये काम करत असतांना शरद तांदळे सरांची दुसरी कंपनी ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ या कंपनीमध्ये देखील त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस मध्ये काम करतांना Billing, Stock update, Interaction with book Sellers/Distributors, Social media marketing, Calling एकंदरीत प्रत्येक कामाचा अनुभव त्यांना आहे. उत्कृष्ट अशी कामाची पद्धत, वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन, प्रत्येक कामाचा एक वेगळा अनुभव घेतांना हळुहळु कामामध्ये आणि ज्ञानामध्ये त्यांची प्रगती होत गेली.

हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव आहे आणि हा अनुभव पुढे देखील खुप कामाचा ठरणार आहे असे श्वेता मॅडम यांना वाटते.

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us