प्रियांका सावळ
कोकणात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साहित्यक्षेत्रात काम करण्याचं स्वप्न घेऊन प्रियांका मॅडम एप्रिल 2024 मध्ये न्यु इरा च्या टीम मध्ये सहभागी झाल्या.
12 सायन्स मधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी साहित्याच्या आवडीमुळे त्यांनी आपले पुढील शिक्षण ‘एम. ए. मराठी’ या विषयात पूर्ण केले. शिक्षण चालू असतानाच प्राथमिक शाळेत 3 वर्ष लिपिक पदावर काम केले. त्यांनतर साहेब रिसर्च सेंटर मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात 2 वर्षे सेवा करत असताना, सोशल मीडिया, YouTube, Exam Managment, Student Counselling इत्यादी कामांचा अनुभव घेतला. कोकणातून मुंबईत आल्यानंतर करियर कोचिंग क्लॉसेस मध्ये मराठी विषय शिकवला. सोबतच मराठी, इंग्लिश टायपिंग, संगणक कौशल्य आत्मसात केले. आणि नंतर साहित्याच्या ओढीने त्यांना न्यु इरा टीम मध्ये सामील करून घेतले. इथे आल्यानंतर न्यु इराच्या YouTube चॅनेलची जबाबदारी त्यांना मिळाली.
प्रियांका मॅडम म्हणतात, “माझ्या कुटुंबाचा असलेला विश्वास, त्यांचे कष्ट, मला न्यु इरा सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर काम करताना नेहमीच प्रोत्साहन देतात, माझ्या प्रत्येक यशात त्यांचा खुप मोठा वाटा आहे. शरद तांदळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करायचे आहे, इथला प्रत्येक अनुभव भरपुर काही शिकवून जातो”