ज्ञानेश्वर वाघ

ज्ञानेश्वर वाघ स्वतःचा व्यवसाय सांभाळत 2019 पासून न्यु इरा मध्ये उत्साहाने कार्यरत आहेत.

ज्ञानेश्वर यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून हॉटेल क्षेत्रात 2 वर्षाचा अनुभव घेतला. वाचन आणि लिखाणाची प्रचंड आवड असल्याने साहित्य क्षेत्रात व्यवसाय करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याच वेळी शरद तांदळे सरांच्या मार्गदर्शनाखाली 2019 साली न्यू इरा टीम मध्ये सहभागी झाले, पुस्तकनिर्मिती पासून ते तयार झालेले पुस्तक वाचकांच्या हाती देण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली, या अनुभवानंतर वर्षभरातच ‘बुकोबा बुक स्टोर’ ची स्थापना करून त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण केले.

आज ज्ञानेश्वर सर ‘बुकोबा’ सोबतच न्यु इरा मध्ये देखिल कार्यरत आहेत. नवीन लेखकांशी संवाद साधणे, मार्केटिंग रिसर्च, सोशल मीडिया मार्केटिंग, इत्यादी जबाबदाऱ्यांसोबत पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असतो.

ज्ञानेश्वर सर म्हणतात “स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास या सोबत भरपूर मेहनत घेण्याची तयारी देखील असली पाहिजे. माझ्या मेहनतीला शरद तांदळे सरांचे मार्गदर्शन मिळाले.”

न्यु इरासाठी कोणतेही काम करण्यास ते सदैव तत्पर असतात..

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us