आश्विनी गव्हाणे

आपल्या कार्यात कष्ट आणि सातत्याने कोणतीही गोष्ट साध्य करता येते असे म्हणणाऱ्या ‘आश्विनी गव्हाणे’ ह्या २०२२ पासून न्यू ईरा टीमचा महत्वाचा भाग आहे.

अश्विनी मॅडम यांनी 11वी आणि 12वी चे शिक्षण पुणे येथील एका कॉलेजमधून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी बाह्य विद्यार्थ्यांप्रमाणे (एक्सटर्नल) एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. एमएससी आयटी करत असताना त्यांचे संध्याकाळचे वर्ग असायचे आणि दिवसभर त्यांनी नोकरी केली. त्या काळात त्यांनी टॅली आणि एम एस सी आयटी शिकवण्याचे काम केले, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली.

या अनुभवामुळे अश्विनी मॅडम यांची व्यावसायिक यात्रा सुरू झाली. त्यांनी एका सीए च्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या कामामुळे त्यांचे अकाउंटिंग मधील कौशल्य वाढण्यास मदत झाली आणि त्यांचे ज्ञान अधिकाधिक वाढले. नंतर त्या ‘इनोव्हेशन’ या कंपनीत सामील झाल्या. ‘इनोव्हेशन’ मध्ये काम करत असताना, त्यांनी ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ या दुसऱ्या संस्थेचे अकाउंटंटचे काम देखील पाहण्यास सुरुवात केली. हे काम करत असताना त्यांना विविध प्रकारच्या अकाउंटिंग कार्यांचे अनुभव घेता आले.

अश्विनी मॅडम यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाने त्यांना अनेक संधी दिल्या आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी दिली. टॅली आणि एम एस सी आयटी शिकवणे, टेलिकॉलिंग , सीए च्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून काम करणे, आणि ‘इनोव्हेशन’ आणि ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ सारख्या कंपन्यांमध्ये अकाउंटंटचे कार्य पाहणे त्याचबरोबर मार्केटिंग करणे या सर्व अनुभवांनी त्यांच्या करिअरला एक नवा आयाम दिला. या संपूर्ण प्रवासात कष्ट आणि सातत्याने कोणतीही गोष्ट साध्य करता येते हे त्यांनी शिकले.

त्यांच्या विविध कामाच्या अनुभवामुळे अश्विनी यांना अकाउंटिंग क्षेत्रातल्या विविध पैलूंची समज वाढली. ‘इनोव्हेशन’ आणि ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांना या क्षेत्रात एक उत्तम करिअर घडवण्याची संधी मिळाली. त्या आपल्या कार्यात सातत्य आणि कौशल्य ठेवून यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांना या क्षेत्रात एक उत्तम करिअर घडवण्याची संधी मिळाली असे आश्विनी मॅडम यांना वाटते.

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us