अमृता तांदळे

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचा पाया मजबूत झाला आहे आणि तो ज्यांच्या अथक परिश्रमामुळे भक्कम झाला त्या म्हणजे संस्थापिका ‘ अमृता तांदळे ’ मॅडम. नव्या लेखकांना प्रकाशनाकडून डावलले जाऊ नये हाच उद्देश ठेवून त्यांनी ह्या प्रकाशन संस्थेचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.

अमृता मॅडम यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले , त्यानंतर त्यांनी BCS केले. तसेच त्यांना शिकविण्याची आवड असल्यामुळे त्यांनी open university मधून बी. ए ची पदवी घेतली. त्यानंतर बॅचलर इन education देखील केले आहे.

स्वप्न पाहणे , ते सत्यात उतवणे सोपे असतेच पण तो प्रवास अतिशय खडतर असतो याची जाणीव अगदी सुरुवातीपासून पावलोपावली येत असतांना मॅडम कोणत्याही कामासाठी तत्परतेने तयार असायच्या. सुरुवातीला अगदी छोट्या कामासाठी देखील त्यांचा सहभाग असायचा. पुण्यातील , पुण्याबाहेरील ह्या क्षेत्रातील जोडलेल्या सर्व व्यक्ति , पुस्तक व्यावसाईक ह्या सगळ्यांशी संवाद करणे , लेखकांशी त्यांच्या विषयाबद्दल बोलणे , ऑफिसमधील सर्व कामाचे नियोजन करणे ह्या सर्वच गोष्टींची जबाबदारी मॅडम यथोचितरीत्या पार पाडतात.

घरच्या सर्व गोष्टी बघून कामाचा हा सर्वच प्रपंच बघणे हे एका जबाबदार ,कर्तुत्ववान स्त्रीचे लक्षण असते. स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे पैलू चमकतांना आपल्या सोबत आपल्या टीमला देखील ती ऊर्जा देणे महत्वाचे असते , न्यू ईरा टीमला ह्या सर्व गोष्टींचे सहकार्य , मार्गदर्शन मिळते ते मॅडमच्या छत्रछायेत राहूनच. त्यांच्या व्यावसायिक अनुभवामुळे ते सर्व टीमला सोबत घेऊन काम करत आहेत , त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होत आहे.

प्रपंच मोठा असला की जबाबदारी तेवढीच वाढते आणि तीच जबाबदारी घेऊन मॅडम ‘ न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस ’ सांभाळत आहे. मॅडम म्हणतात , ‘ न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस एक परिवार आहे , नवीन तरुण लेखकांना त्यांच्या उत्कृष्ट लिखाणामुळे कुठेही अडवले जाऊ नये , मराठी साहित्य क्षेत्रात त्यांच्या योगदानाला आमचे पाठबळ आहे , अश्या लेखकांसाठी न्यू ईरा हे हक्काचे व्यासपीठ आहे , आणि त्यासाठी आमचे अथक परिश्रम नेहमी असणार’.

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us