अजित गांजवे

पुस्तकांचे वाचन हे आपल्याला नवीन दृष्टीकोन देते, ज्यामुळे आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू शकतो. असे म्हणणारे ‘अजित गांजवे ’ हे २०२४ पासून न्यू ईरा टीमचा महत्वाचा भाग आहे.

अजित गांजवे सर हे MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन्स) चे विद्यार्थी आहेत. त्यांनी अभिनव एज्युकेशन सोसायटी, नर्‍हे आंबेगाव येथे शिक्षण घेतले आहे. त्याआधी त्यांनी BCA (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन्स) चे शिक्षण ACS कॉलेज, नारायणगाव येथे पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी वेब डेव्हलपमेंट कोर्स केला, ज्यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढले. हे शिक्षण त्यांच्या तांत्रिक क्षेत्रातील कारकिर्दीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.

अजित गंजवे यांनी डिसेंबर २०२१ पासून ग्रंथप्रेमी या कंपनीत पुस्तक विक्रेता आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञ म्हणून काम सुरू केले. ग्रंथप्रेमीमध्ये त्यांनी पुस्तक विक्रीची तंत्रे शिकली आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून पुस्तकांच्या विक्रीला चालना दिली. डिजिटल मार्केटिंगमधील त्यांच्या कौशल्यांमुळे त्यांनी कंपनीच्या व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये अजित सरांनी न्यू ईरा कंपनीत पुस्तक विक्रेता आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञ म्हणून नवी सुरुवात केली. या नवीन नोकरीमध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या अनुभवांचा वापर करून कंपनीच्या व्यवसायात प्रगती केली.

‘न्यू ईरा ‘ संस्थेत सामील झाल्यानंतर त्यांच्या जीवनातले पहिले वाचलेले पुस्तक म्हणजे ‘रावण’. या पुस्तकाने त्यांच्या विचारांवर आणि जीवनावर प्रचंड प्रभाव टाकला. ‘रावण’ या पुस्तकातून त्यांनी शिकले की आपण स्वतःचे जीवन स्वतः घडवू शकतो. स्वतःचे राज्य स्वतः उभारणे हेच खरे यश आहे. ‘रावण’ पुस्तक वाचल्यानंतर त्यांना वाचनाची आवड लागली. ही आवड वाढतच गेली आणि त्यांनी विविध प्रकारची पुस्तके वाचायला सुरुवात केली.

वाचनामुळे आपल्यातील विचारशक्ती वाढते आणि आपण अधिक सर्जनशील होतो. वाचनाची आवड जोपासून आपण आपले जीवन अधिक आनंददायक आणि यशस्वी करू शकतो. हे न्यू ईरा टीम चा भाग झाल्यावर समजले. आणि हा अनुभव पुढे देखील खुप कामाचा ठरणार आहे असे अजित गांजवे यांना वाटते.

यासाठी ते सर आणि मॅडम यांचे मनापासून ऋणी आहेत.

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us