विजय देवडे
‘एकलव्य’ ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक विजय देवडे सर हे मूळचे नांदेडचे पण आता पुण्यात स्थायिक आहेत. त्यांचे पदवीचे शिक्षण औरंगाबादमध्ये झाले. शरद सर आणि विजय सर यांची ओळख तशी जुनी. Contractor पासून सुरू झालेला हा प्रवास दोन लेखकांना जन्म देणारा ठरला.
महाभारताच्या गोष्टी आपण सगळेच लहानपणापासून ऐकत , वाचत असतो. विजय सरांनाही त्याबद्दल कुतूहल वाटायचे. कॉलेजमध्ये आल्यावर त्यांचे इतर वाचन असायचे , त्याबरोबरच महाभारताविषयी ग्रंथ त्यांनी वाचले. ते वाचत असतांना ‘एकलव्य’ हे पात्र त्यांना जास्त आकर्षित वाटले.
विजय सर सांगतात , “एकदा शरद तांदळे सरांशी सहज बोलत असतांना सर म्हटले की जर तू एवढा महाभारताचा वाचक आहेस , एकलव्य तुला इतका आवडला आहे तर त्याच्यावर लिहीत का नाहीस ? माझ्यासारख्या सामान्य माणसाला लिखानाची जास्त सवय सुद्धा नाही , आधी हे गमतीवर घेतले पण नंतर शरद भाऊंच्या प्रोहोत्साहनामुळे मी हे मनावर घेतले आणि एकलव्य पुस्तकाची निर्मिती झाली. हा प्रवास सोपा नव्हता , माझ्यासारख्या नव लेखकाला हे चॅलेंजिंग होते , पण मनात ठरवले तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो.”
विजय सरांनी एकलव्य लिहिण्यासाठी अनेक पुस्तके वाचली , ग्रंथ , कादंबरी वाचले. ते वाचतांना त्यांना एकलव्य अधिक उलगडत गेले. अनेकांना इतकेच माहीत असते की एकलव्यने गुरु दक्षिणेत अंगठा आपल्या गुरु द्रोणाचार्य यांना दिला , म्हणून आपल्याला सांगण्यात येतेच की एकलव्य त्यागाचं प्रतीक आहे. पण यापलीकडे महाभारतातील हे प्रभावी व्यक्तिमत्व आपल्या समोर जास्त स्वरूपात येत नाही.
एकलव्य एक बुद्धिमंत हुशार राजा होता , त्यांनीही अनेक युद्ध लढली आहेत. तो पण एक महान योद्धा होता , त्याला लोकांपर्यंत वेगळ्या स्वरूपात वाचकांसमोर आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.