डॉ. नितीन हांडे, पुणे
शिक्षण: पीएच. डी. (अर्थशास्त्र)
१) बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे सहायक प्रकल्प संचालक पदावर पाच वर्षे. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी स्वरूपाचे काम
२) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे येथे सहायक प्राध्यापक पदावर एक वर्ष. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी स्वरूपाचे काम.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा २००६ पासूनचा कार्यकर्ता.
वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन, फलज्योतिषाला आव्हान, आधुनिक बुवाबाजी आणि छद्म विज्ञान, बुवाबाजी आणि चमत्कार या विषयावर सप्रयोग सादरीकरण, महिला आणि अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा, सांस्कृतिक अभिव्यक्ती, हसत खेळत विज्ञान इत्यादी विषयावर आजवर शेकडो व्याख्याने. पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन.
डावकिनाचा रिच्या या नावाने सोशल मीडियावर विज्ञान विषयक मांडणी केलेले लेख ब्लॉग, विविध संकेतस्थळावर तसेच विविध नियतकालिकांमध्ये लेख प्रसिद्ध.
दैनिक पुण्यनगरी मध्ये “सोप्पं आहे हे” या सदराचे लेखन
प्रकाशित पुस्तके :
१) ज्ञानाचा प्रवाहो चालिला
२) आपले भवताल
३) अनुवाद : डीप थिंकिंग – गॅरी कास्पारोव्ह
४) अनुवाद : लर्न टू अर्न – पिटर लिंच