
डॉ. ऐश्वर्या रेवडकर
जन्मगाव बार्शी.
DOB 8th June 1986
व्यवसाय स्त्रीरोगतज्ज्ञ . Gynecologist – MBBS, DGO from Pune.
Hobbies – Travelling, writing.
महाराष्ट्राच्या शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत काम. छत्तीसगडमध्ये गेली पाच वर्षे आदिवासी भागात सरकारी रुग्णालयात काम.
विविध मासिके आणि वृत्तपत्रांतून कविता, ललित लेखन.
मराठी ब्लॉग : मातीची मुलगी www.matichimulagi.blogspot.com
२०१८-१९ मध्ये, छत्तीसगडमधील अनुभवांबद्दल साप्ताहिक साधनामध्ये ‘बिजापूर डायरी’ या नावाने नियमित सदर लेखन.
ऑगस्ट २०१९ मध्ये ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाचे प्रकाशन. (साप्ताहिक साधना प्रकाशन)
२०१९ चा ललित गद्य – प्रथम प्रकाशन यासाठीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा ताराबाई शिंदे पुरस्कार (पन्नास हजार रुपये व स्मृतीचिन्ह) बिजापूर डायरी पुस्तकाला जाहीर.
२०२१ मध्ये यशवंतराव चव्हाण युवा साहित्यिक पुरस्कार.
2022 पासून, बिजापूर डायरी स्वतः लेखिकेच्या आवाजात स्टोरीटेलवर उपलब्ध.
2023 मध्ये बिजापूर डायरी पुस्तकाचा कन्नड अनुवाद प्रकाशित.
२०२२ पासून दिवाळी अंकात कथा आणि ललित लेखन.
२०२३ च्या चार दिवाळी अंकात कथा लेखन. अक्षरलिपी अंकातील बकुळडंख या कथेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार.
२०२३ मध्ये सिंधुदुर्ग प्रतिष्ठानतर्फे जयंत पवार उत्कृष्ट कथा पुरस्कार.
सामाजिक काम – शाळा आणि कॉलेजातील तरुण तरुणींसाठी शरीर ज्ञान, मासिक पाळी, कुमारावस्था, आकर्षण, कंसेंट, लैंगिक अत्याचार, लिंगसमानता या विषयांवर विविध राज्यांत (महाराष्ट्र, छत्तीसगड, काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान) व्याख्यान.





