
अभिषेक अवचार
अभिषेक अवचार (खयाल)
भारत – तिबेट मैत्री संघाचे युवक तथा विद्यार्थी कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उतरप्रदेशमध्ये “साहित्य श्री” या उपाधिने सन्मानित साहित्यिक मालेगाव येथील अभिषेक वसंतराव अवचार यांचा ‘खयाल’ हा हिंदी काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध युवा प्रबोधनकार कन्हैया कुमार यांच्या हस्ते पुणे येथे प्रकाशित करण्यात आला.
अभिषेक अवचार हे विविध राजकिय पक्षाचे सल्लागार म्हणून काम करतात. तसेच भारतीय संविधानाच्या मुलतत्वांना अनुरूप मानवता, एकता, अखंडता, न्याय, समानता तथा सर्व – धर्म – समभाव या तत्वांना अनुसरून लेखन तथा देशातील विविध राज्यांमध्ये प्रबोधन देखील करतात. युवा लेखकांनी राष्ट्र भावनेने प्रेरित साहित्याची निर्मीती मोठ्या प्रमाणावर केल्यास आपल्या देशातील युवा पिढीमध्ये निश्चितपणे राष्ट्रप्रेम जागृत होऊन देशात सौदार्हाचे वातावरण तयार होईल. याच उद्देशाने ते देशातील विविध राज्यात जाऊन प्रबोधन करतात.
त्यांनी आजपर्यंत उतरप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल, दिल्ली, गोवा तथा महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांमधे जनजागृती केली आहे. मराठी, हिंदी तथा उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून या भाषेमधे त्यांचे ‘वंदे – मातरम्’, ‘आझाद तिरंगा’ हे हिंदी भाषेत, तर ‘आजही…’ हा काव्यसंग्रह मराठी भाषेत प्रकाशित झाला आहे.
नुकताच त्यांचा हिंदी – उर्दू भाषेतील याच विचारांवर आधारित ‘खयाल’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध युवा प्रबोधनकार तथा भारतीय संविधानचे पुरस्कर्ते कन्हैया कुमार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ‘रावण’ कादंबरीचे लेखक तथा प्रसिद्ध उद्योजक शरद तांदळे, डॉ सुदर्शन घेरडे, ‘ओपन लायब्ररी मुव्हमेंट’च्या अध्यक्षा कु. प्रियांका चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे प्रकाशित करण्यात आला. यावेळी कुमार यांनी ‘खयाल’ या काव्यसंग्रहाची प्रशंसा केली. यावेळी युवराज शहा, चित्रसेन गायकवाड, राहुल पोळके आदी मान्यवर उपस्थित होते. या काव्यसंग्रहाचे कौतुक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींकडून होत आहे.











