विशाल गरड

लेखक विशाल गरड हे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक असामन्य उंची लाभलेलं एक व्यक्तिमत्व आहेत. त्याच्या आयुष्याचा आलेख हा आपल्या सर्वांनाच थक्क करणारा आहे. त्यांनी आत्तापर्यंत विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये विविध विषयांवर भाष्य करणारा ‘ह्रदयांकित’ हा काव्यसंग्रह, वास्तव ग्रामीण लघुकथांचा संग्रह असलेले ‘रिंदगुड’ हे पुस्तक, व्याख्यानांची रोजनिशी असलेले ‘मुलूखगिरी’, लिहिण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला पथदर्शी ठरलेले ‘व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय’, समाजात दिसणाऱ्या प्रत्येक विषयावर लिहिलेल्या सप्तरंगी लेखांचा संग्रह असलेले ‘बाटुक’, छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावर भाष्य करणारी ‘रायरी’ कादंबरी सारखी उत्तोमोत्तम पुस्तकांचे लेखन त्यांच्या हातून झाले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रपर एक अभ्यासपूर्ण आणि ऐतिहासिक पुस्तक देखील ते लवकरच प्रकाशित करणार आहेत..

डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव ता.बार्शी या नामवंत संस्थेत सन २०१३ पासून ते पिकशास्त्र आणि पर्यावरण या विषयांच्या अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी सर्व महापुरुषांच्या चरित्रपर आणि विविध सामाजिक विषयांवर संबंध महाराष्ट्रासह परराज्यात आजवर दिड हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

विशाल गरड हे एक कलाप्रेमी सुद्धा आहेत. फक्त बॉलपेनच्या साहाय्याने चित्र रेखाटण्याची कला जोपासताना विशाल गरड यांनी आजवर सहाशेहुन अधिक चित्रे रेखाटली आहेत. महानायक अमिताभ बच्चन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याकडून या कलाकृतींचे कौतुक झाले आहे. तसेच ते अनेक लघुचित्रपटांच्या, वेब पोर्टलच्या आणि पुस्तकांच्या नावाचे सुलेखन (कॅलिग्राफी) देखील करतात. विशाल गरड यांनी इंगित प्रॉडक्शनच्या माध्यमातून लॉकडाऊनची व्यथा सांगणारा ‘दैना’ आणि शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित ‘बुचाड’ या लघूचित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करून निर्मिती केली आहे. पैकी बुचाड या लघुचित्रपटाला फेब्रुवारी २०२१ मध्ये तेलंगणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कम्युनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, तसेच दिव्य मराठी फिल्म फेस्टिव्हल, उज्जैन फिल्म फेस्टिव्हल (इंदोर) यांसह इतर चित्रपट महोत्सवात देखील बुचाडला यश मिळाले आहे. प्रणित देशमुख दिग्दर्शित ‘सर’ या चित्रपटात भैय्यासाहेब नावाच्या शिक्षण संस्थापकाच्या मुलाची भूमिका सुद्धा त्यांनी साकारली आहे. तसेच स्वतः लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या दैना या लघुपटात ‘मालकाची’ आणि ‘बुचाड’ या पुरस्कारप्राप्त लघुचित्रपटात ‘भीमा’ या शेतकऱ्याची मुख्य भूमिका वठवली आहे. साहित्य, कलेबरोबरच सामाजित कार्यात देखील विशाल गरड नेहमी आपली मोलाची भूमिका बजावतात. आपला प्रत्येक वाढदिवस दिव्यांग मुली आणि वृद्धाश्रमाला मदत देऊन साजरा करतात. व्याख्यानातून मिळणारे मानधन निराधारांना मदत, वृक्षारोपण, मोफत पुस्तक वाटप, गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, निराधार वृद्धांना आधार आणि इतर प्रबोधनात्मक सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरतात. तसेच त्यांनी शिवजयंतीनिमित्त झालेल्या व्याख्यानाचे मानधन हॉस्पिटलला मदत म्हणून दिले आहे. त्यांनी पुस्तक विक्रीच्या नफ्यातून मिळणारी रक्कम दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिलेली आहे. त्याचबरोबर स्वतःच्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून त्यांनी दिली होती. दरवर्षी अनेक स्वयंअर्थसाहाय्यीत अनाथ मुलांच्या शाळांना धान्य वाटप ते करतात. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांच्या समाजकार्यात त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्रातील शेकडो वाड्या वस्त्यांवर जाऊन व्याख्यानांची मुहूर्तमेढ रोवून प्रबोधनाचा जागर त्यांनी केला आहे. सोलापूरच्या इको फ्रेंडली क्लबच्या सौजन्याने दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी तब्बल सतरा श्रोत्यांसह महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करून त्या शिखरावर ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यान देऊन त्यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. विशाल गरड यांचे शेकडो लेख आणि बातम्या महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या असून टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू सारख्या देशपातळीवरील दैनिकांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. दिनांक ७ जुलै २०१५ रोजी सोलापूर आकाशवाणीने मुलाखत घेऊन त्यांचा सन्मान केला होता. दिनांक ११ ऑगस्ट २०१९ रोजी सह्याद्री वाहिनीने विशाल गरड यांच्या कालागुणांवर प्रकाशझोत टाकणारी विशेष मुलाखत घेऊन त्यांचा गौरव केला आहे. दिनांक ६ जून २०२० रोजी अमेरिकास्थित शार्लट मराठी मंडळाकडून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशाल गरड यांच्या विशेष व्याख्यानाचे अमेरिकेत आयोजन झाले होते. साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरावरील एकूण सोळा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या कार्यामुळे विशाल, जीवनगौरव पुरस्कार २०१५ (पुणे), डॉ.बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार २०१६ (मुंबई), शिवगौरव पुरस्कार २०१६ (बार्शी), शिक्षकरत्न पुरस्कार २०१६ (सोलापूर), काव्यपुरस्कार पुरस्कार २०१७ (माढा), अजिंठा कला पुरस्कार २०१७ (परळी), सह्याद्री पुरस्कार २०१७ (पुणे), समाजरत्न पुरस्कार २०१७ (बार्शी), आदर्श युवा पुरस्कार २०१८ (अरण), वक्तृत्व भूषण पुरस्कार २०१८ (नांदोरे), साहित्य पुरस्कार २०१८ (चिखली), महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ (बार्शी), कुतूहल पुरस्कार २०२० (पांगरी), स्फूर्ती पुरस्कार २०२० (साकत पिंपरी), सर्वोत्कृष्ट लघुपट ‘बुचाड’ २०२० (तेलंगाणा), डॉ.कुंताताई जगदाळे जीवन गौरव पुरस्कार २०२१ (बार्शी) यांसारख्या अनेक पुस्तकांचे मानकरी ठरलेले आहेत.
Vishal Garad-3
Vishal Garad-10
Vishal Garad-9
Vishal Garad-8
Vishal Garad-7
Vishal Garad-6
Vishal Garad-5
Vishal Garad-2
Vishal Garad-1
Vishal Garad-4
previous arrow
next arrow
Vishal Garad-3
Vishal Garad-10
Vishal Garad-9
Vishal Garad-8
Vishal Garad-7
Vishal Garad-6
Vishal Garad-5
Vishal Garad-2
Vishal Garad-1
Vishal Garad-4
previous arrow
next arrow
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us