prashasak

अंत नेहमीच दुःखद नसतो – जयश्री वाघ

(शिक्षिका , कवयित्री , लेखिका) आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे संदर्भ लावत बसू नये नि प्रत्येक अनूभवाचे अन्वयार्थही शोधत बसू नयेत.येऊ द्यावं येणाऱ्या पावसाला , वाहू द्यावं वाऱ्याच्या झोताला, घालू द्यावं आच्छादन अंधाराला ,उगऊ द्यावं पहाटेच्या सूर्य बिंबाला. हे सारं घडतच असतं, घडणारच असतं .आपल्या मनोरथांचे मनोरे आभाळाला भिडतातच असे नाही . कोसळू द्यावेत ते पत्त्यांच्या …

अंत नेहमीच दुःखद नसतो – जयश्री वाघ Read More »

स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे – विजय रहाणे

नांगरे पाटलांचं एका शाळेत झालेले भाषण खूप फेमस झालं होतं. तेच ते स्पर्धा परीक्षा, If you fail to plan.., साडेतीन वाजता उठणं, स्वर्गीय कारण वगैरे! ते भाषण खूपच व्हायरल झाल्यामुळे नांगरे पाटील जवळजवळ सगळीकडे माहित झाले. इतकं नाव आधी कोणत्या अधिकार्‍याचं झालेलं नसेल. अर्थात ते भाषण वक्तृत्वाचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. भाषेतील अलंकार त्यात …

स्पर्धा परीक्षा आणि आयुष्याला घोडे – विजय रहाणे Read More »

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार – प्रियंका अशोक सरवार

(freelance writer, blogger, poet) आपण अनेक गोष्टी लिहीत राहू ,वेदना मांडू ,दुःख व्यक्त करू , हळहळ व्यक्त करू , लिहितांना आणि आपले दोन चार विचार मांडतांना आपणही चार सल्ले आणि जीवनाचे धडे देऊ. पण #आत्महत्या करणाऱ्या तिथपर्यंत जाणाऱ्याच्या मनाची घालमेल आणि तिथपर्यंत जात असणाऱ्या मनाची व्यथा आपण नाहीच समजू शकत , ती मनस्थिती समजणे इतके …

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार – प्रियंका अशोक सरवार Read More »

आधी स्वीकार स्वतःचा – प्राजक्ता नागपुरे

(freelance writer , poet ) मी लेस्बियन आहे. हे सांगतांना मला लाज किंवा संकोच वाटत नाही, कारण मी काहीही वाईट वागत नाहीये. समाजाच्या मते, स्वतःचा स्वीकार करणं चुकीचं असेल, तर मी ही चूक करायला तयार आहे.” सोसायटीत राहणारी सोळा वर्षांची मुलगी तिच्या मित्र-मैत्रिणींसमोर स्वतःच्या लैंगिकतेचा मोकळेपणाने स्वीकार करत होती. घरचे काय म्हणतील? समाज काय म्हणेल? …

आधी स्वीकार स्वतःचा – प्राजक्ता नागपुरे Read More »

ट्रॉयच युद्ध : मनीषा उगले

( शिक्षिका , कवयित्री , लेखिका ) ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात ट्रॉय हे सर्वच दृष्टया भरभराटीला आलेलं एक संपन्न राज्य होतं. जन्मजात दैवी सौंदर्याची देणगी लाभलेला ‘पॅरिस’ हा तिथला राजपुत्र. त्याचं मन जडलं ते पश्चिमेकडच्या ग्रीक साम्राज्यातील स्पार्टाचा राजा मेनेलॉस याची पत्नी हेलनवर. हेलन म्हणजे त्याकाळची त्रिभुवन सुंदरीच जणू! अनेक देशांतील राजांना तिचा मोह झाला होता. …

ट्रॉयच युद्ध : मनीषा उगले Read More »

upsc चा खेळ : संजय आवटे (संपादक : लोकमत)

‘यूपीएससी’मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला ‘कोचिंग क्लासेस’च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा पाऊस पडतोय. अशावेळी ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही”, अशी स्थिती असलेल्या पोरा-पोरींकडे कोणाचे लक्ष नाही. स्पर्धा परीक्षांचा बाजार सध्या एवढ्या तेजीत आहे की अशा मुलांकडे …

upsc चा खेळ : संजय आवटे (संपादक : लोकमत) Read More »

सुयोग बेंद्रे (नायब तहसीलदार , कोरेगाव भीमा)

कोरेगावहून आमची शासकीय गाडी पाटण च्या दिशेने निघाली. पाटण मध्ये डोंगर कडा कोसळून माणसे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मदत कार्याचे सहा संयोजन को-ऑर्डिनेशन करण्यासाठी तहसील कार्यालय पाटण येथे पुढील तीन दिवस तुमची नेमणूक करण्यात आली आहे असा जिल्हाधिकारी कार्यालयाचा अतितातडीचा निरोप संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्हाला मिळाला. संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोरेगाव …

सुयोग बेंद्रे (नायब तहसीलदार , कोरेगाव भीमा) Read More »

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us