“अखेरचा लढा “ही एका ऐरावताची गगन भेदी किंकाळी होती. योद्ध्यांनी पुकारलेली ती एक रस्त्यावरची लढाई होती. समाजाला सोबत घेत काढलेली ती एक संघर्षयात्रा होती. अखेरच्या लढ्यातूनच जागृतीचा यज्ञ राज्यभर पेटता राहण्यास मदत झाली. आपल्या बलस्थानांची ओळख झालेली तरुणाई आत्मविश्वासाने बोलायला लागली. परस्परांच्या सहकार्याने आणि सहवास सन्मानाने जी ऊर्जा या लढ्यात मिळाली, ती हजारो पुस्तकांच्या शब्दांनाही देता आली नसती. अखेरच्या लढ्याने एक अशी संघर्षगाथा लिहिली. त्यातून अन्यायाच्या विरोधात वर्षानुवर्ष लढणाऱ्या पिढ्या जन्माला येतील, अन् संघर्षाचा पवित्र अधिकार बजावत राहतील…..