रत्नेश चोरगे
रत्नेश चोरगे २०२२ पासून न्यू ईरा टीमचा भाग आहेत. याआधी तीन-चार वर्ष डिझाईन क्षेत्रात सतत काम करत असल्यामुळे तरुण वयातच चांगल्या प्रकारे स्वतःचे व्यक्तिमत्व त्यांनी तयार केले आहे.
१२ वी पासून विविध मासिके आणि पुस्तके मांडणीचे काम करत असल्यामुळे वेगवेगळे लेख, पुस्तकं वाचायची ओढ त्यांना तरुण वयातच लागली.
रत्नेश सर B.COM चे शिक्षण घेत असताना न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस मध्ये काम करण्यास सुरूवात केली. टायपिंग, पुस्तक मांडणी, मुखपृष्ठ डिझाईन, सोशल मिडीया पोस्ट अशी डिझाईनची सर्वच कामे ते न्यू ईरा प्रकाशनामध्ये करत आहे. त्यासोबत सोशल मिडीया मार्केटींग, ऑनलाईन बुक सेलींग हे देखील काम करतात. त्यांचे डिझाईन क्षेत्रातील अनुभव आणि कामाचा वेग न्यू ईरा टीमला पाठबळ देणारे आहे.
रत्नेश सर म्हणतात, “शरद तांदळे सरांचे मार्गदर्शन योग्यवेळी भेटत असल्याने मला माझ्या कामाची जिद्द व चिकाटी यावर योग्यरित्या प्रभुत्व मिळवता आलं. न्यू ईरा टीमच्या परिवारात मला सहभागी करून घेतल्याबद्दल सर आणि मॅडम यांचे मनापासून आभार.”