The Entreprenuer (द आंत्रप्रेन्युअर) (हिंदी)

250

Availability: 99 in stock

SKU: 9788194782803 Category: Tag:

इस किताब में आप देखेंगे कि कैसे एक साधारण लड़का मेहनत करके कामयाबी की सीढ़ी चढ़ता है और सबसे कम उम्र के उद्यमी का पुरस्कार जीतता है। आपकी जिंदगी में जो सवाल हैं, उनके जवाब कहीं न कहीं आपको यहीं मिलेंगे, कम से कम दिशा तो मिलेगी। इस पुस्तक को पढ़ने से सारी नकारात्मकता दूर हो जाएगी और आपको नए रास्ते खोजने का नजरिया मिलेगा।
शरद तांदळे ने इस पुस्तक के माध्यम से नए उद्यमियों को सही रास्ता खोजने का एक नया तरीका दिया है।

Weight 200 g
Writer

Sharad Tandale

Number of Pages

192

Reader's Reviews

  1. अनुष्का बिडवे, दौंड
    “तू एवढी वर्थलेस का समजतेस स्वतःला?” पप्पा मला नेहमी म्हणत असतो.
    “कारण मी काही अचिव्ह केलेलं नाहीये…” मी.
    आणि मग पप्पा मला त्याच्या स्पेशल आणि प्रभावी मोटीवेटिंग स्टाइलने समजावत राहतो.
    फेल्युअरची काही भीती नाहीये मला, पण सो कॉल्ड सक्सेस नसण्याचा न्यूनगंड होता. ‘पप्पा आणि पुस्तके’ (तीही पप्पानेच रेकमेंड केलेली) असे दोन महत्वपूर्ण फॅक्टर्स मला या वाईट विचारसरणीतून बाहेर काढत असतात.
    ‘फिफ्टी नाइन सेकेंड्स’, ‘द सटल आर्ट..’ अशी या जॉनरची बरीच पुस्तके वाचण्यात होती. एकदा काय झालं, मी आणि पप्पा असेच आप-आपली पुस्तके वाचत शेजारी शेजारी पडलो होतो. जरा वेळाने पप्पाने मोबाइल घेतला आणि सर्फिंग करत बसला. थोड्यावेळाने मला पुस्तकाआडून पप्पाच्या चेहर्‍यावर हास्य दिसलं.
    “काय रे?”
    “काय भारी माणूस आहे हा!”
    “कोण?” मी विचारलं.
    “एक स्पीकर आहे. त्याला ‘यंग आंत्रप्रेन्युअर अवॉर्ड’ मिळाला आहे. किती छान आणि मोटिवेटिंग बोलत आहे! त्यांचं ‘द आंत्रप्रेन्युअर’ पुस्तक मागवून बघावं म्हणतो…”
    थोड्या दिवसातच पुस्तकाचं आगमन झालं. पप्पा पुस्तक वाचत होता त्या काळात मध्ये-मध्ये त्याला विचारायचे पुस्तकाचा फीडबॅक. पण हे पुस्तक संपायला जरा जास्तच दिवस लागत होते! माझी दोन पुस्तके झाली तरी पप्पा हेच पुस्तक अजून वाचत होता (नेहमी हे गणित उलट असतं, म्हणून जास्त आश्चर्य वाटत होतं!).
    “किती दिवस झाले रे हे पुस्तक वाचतोयस?” मी
    “अगं, दुसर्‍यांदा वाचतोय!”
    मग या प्रकाराने माझी उत्सुकता वाढवली. ‘Gentlemen, you have had my curiosity but now you have my attention!’ जसा डायलॉग जांगो मुव्ही मध्ये आहे, तसंच माझं झालं. म्हणून मग मी सुद्धा शरद तांदळे सरांचं ‘द आंत्रप्रेन्युअर’ वाचायला घेतलं.
    इंडेक्स आणि सुरुवातीची काही पाने वाचून हे फक्त ज्यांना बिझनेस करणार्‍यांसाठी आहे असं वाटलं.
    ‘ही एका बिझनेसमनची सक्सेस स्टोरी आहे’, असा ग्रह ठेऊन मी हे पुस्तक वाचत राहिले. पण जसजसे वाचत गेले तसं हे समजलं- ही प्रत्येक वाचकाची पर्सनल स्टोरी आहे आणि या पुस्तकातील नायक हा केवळ ‘representative of society’ आहे! रॅट रेस, मेंटर, जॉब, स्ट्रगल..सर्व मुद्दे अजून छान पद्धतीने पटू लागले.
    मला या पुस्तकातलं सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती ते सांगू? खूप कमी वेळा एखादी व्यक्ती आपण केलेल्या चुका प्रांजळपणे मान्य करते. पुस्तकात लिहिणे तर दूरच, पण आपण स्वतःशी सुद्धा आपली चूक मान्य करत नाही. हे किती सहजतेने शरद सरांनी आपला पुस्तकात मांडले आहे. त्यांनी केलेल्या चुका, त्यातून ते कसे सावरले… त्यांनी आपल्या सर्व चुका मान्य केल्या आहेत आणि हेच हे पुस्तक भावण्याचं सर्वोत्तम कारण आहे असा मला वाटतं. त्यामुळे लिहिणारा कोणी आपला मित्रच आहे असा वाटून जातं! जर आपल्या या मित्राने या सर्व चुका केल्या आणि त्यातून तो सावरला, तर आपण का हे नाही करू शकत? अशी भावना वाचकांपर्यंत पोहचविण्यात सर यशस्वी ठरले आहेत असं मला वाटतं.हे पुस्तक वाचून खूप-खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे, ते म्हणतात ना, ‘Life is simple but not easy’ आयुष्यात बर्‍याच गोष्टी खूप सोप्या आहेत. कधी कधी (खरंतर बर्‍याच वेळा) आपण सोप्या गोष्टी आपल्याच हातांनी अवघड करून घेत असतो, असं मला जाणवलं. आपला ध्येय निश्चित असतं, पण वाट चुकीची असते. ‘You gotta do what you gotta do’ हे धोरण आपण लक्षात ठेवायला हवं.
    सर्वांना सुख हवं असतं….सतत! का? मला असं वाटतं की सुखाएवढंच दुःखदेखील गरजेचं आहे. कारण जेव्हा दुःख असेल, तेव्हाच सुख येईल ना? कोणी म्हणेल की हे सर्व म्हणायला फार सोपं आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं वगैरे… किंवा हे सर्व वाचून करून काही आपल्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन कुठे मिळतं? नाही मिळत, पण त्या प्रॉब्लेम्सला कसं सामोरं जावं आणि या प्रॉब्लेमशी कसं लढावं याची ताकद मात्र नक्की येते!
    ‘My life, my rules’ हा अलिकडचा पॉप्युलर असलेला क्वोट! काही प्रमाणात बरोबरही आहे, पण दुसर्‍याचं म्हणणं ऐकूनच न घेणे हा त्याच्या मागचा हेतू नसावा. दुसर्‍यांच्या म्हणण्यानुसार जगू नये, पण ज्या मोजक्या लोकांवर आपला विश्वास आहे, त्यांचं किमान ऐकून तरी घ्यावं!
    असे बरेच काही मुद्दे मी या पुस्तकातून शिकले. मी पण या सर्व गोष्टी आचरणात आणण्याचा खूप जोमाने प्रयत्न करणार आहे!
    एक खूप चांगली गोष्ट हे पुस्तक मला शिकवून गेली. काही करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो, तरी पण प्रत्येक आयुष्यातील गोष्ट त्या त्या वेळेला करायला हवी. ‘Better late than never’ बरोबरच ‘A stich in time saves nine’ हेही लक्षात रहायला हवं.
    आयुष्यातील बर्‍याच गोष्टी करण्यासाठी वेळ गेला, असं वाटून राहतं…..पण या पुस्तकाबद्दल मला असं वाटत नाही. हे पुस्तक मी अगदी योग्य वेळी वाचलं आहे, असं प्रत्येक वाचकाला वाटल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!
  2. प्रियंका सरवार
    शरद तांदळे सरांचे हे पुस्तक आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आपल्याला ज्यात रस आहे असा मार्ग निवडून, त्यात यशस्वी होऊन मार्गक्रमण कसे करू शकतो, हे त्यांच्या आयुष्याच्या अनुभवातून सांगणारे पुस्तक आहे.आजही प्रवाहाच्या मार्गाने अनेक विद्यार्थी जातात.
    करिअर म्हणजे इंजिनिअरिंग आणि डॉक्टर व्हायचं, मोठ्या कंपनीत जॉब घेऊन वा स्पर्धा परीक्षेत उरतून अधिकारी होऊन नाव पैसा कमवायचा हेच आजही अनेक मुलांना वाटतंच. वाटणे चूक नाही, पण सगळ्यांना हेच करणे शक्य आहे का? तर मुळीच नाही.ज्याचा त्याची ठेवण वेगळी असते, रस वेगळा असतो. सगळे करतात म्हणून आपण त्याच मार्गाने जाणे कितपत योग्य आहे?हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कुठेतरी एकदा तरी वाटते की, हे आपल्याच आयुष्यातलं साम्य आहे, आपणही यातून गेलो आहोत, जात आहोत. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच तुमची सकारात्मक भूमिका वाढवते, तुम्हाला प्रेरणा देते.तांदळे सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे की, तरुण युवकांनी आपल्या आयुष्यात आपला मार्ग कसा धरला पाहिजे आणि त्या मार्गावर जिद्दीने काम करायला पाहिजे.
    यश नक्कीच मिळते मग क्षेत्र कोणतेही असो.

    सरांबद्दल तर सगळ्यांना माहीतच आहेत, पण ह्या पुस्तकातून सर अजून जवळचे वाटतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातल्या समरस असणाऱ्या गोष्टी, सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारे चढउताराचे दिवस, अडचणी ह्या सगळ्या गोष्टी सर त्यांचे अनुभव सांगताना आपल्याच वाटतात.

    एक सामान्य मुलगा भरारी घेतो आणि सगळ्यात तरुण उद्योजकचा पुरस्कार मिळवतो, इथपर्यंतचा प्रवास कसा साधतो हे या पुस्तकातून तुम्हाला कळेन. कुठेतरी आपल्याही आयुष्यात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील, निदान त्याची दिशा तरी नक्कीच मिळेन.
    नवीन उद्योजकांना दिशा देणारे हे पुस्तक आहे.

  3. सचिन काळे
    शरद तांदळे सरांच्या #द_आंत्रप्रेन्युअर या पुस्तकाबद्दल मी खूप वेळेस ऐकलं होतं. मला माझ्या सहवासातील बऱ्याच जणांनी सल्ला पण दिला होता की, तू एकदा तरी शरद तांदळे सरांचं हे पुस्तक वाच. पण त्यांचा सल्ला मी नेहमी टाळत असायचो. मागच्या काही दिवसात मला वाचन करावसं वाटलं, पण नेमकं वाचावं काय हे कळत नव्हतं.
    एक दिवस माझी आदेश शिंदे यांच्या बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ते माझे चांगले मित्र बनले. त्याच बरोबर माझ्या आयुष्यात ते माझे एक आदर्श ही ठरले. कारण त्यांच्याच मुळे माझा वाचनाकडे जास्त कल वळला. शरद तांदळे सरांची पुस्तकं वाचायची इच्छा त्यांनीच माझ्या मनात रोवली. त्यांचे मी फार आभार मानतो. त्यांच्या मुळेच मी त्यांचा व शरद तांदळे सरांचा चाहता झालो. त्यांच्यामुळेच आज मला वाचण्याचा छंद जडला आहे. “वाचाल तर वाचाल” हे शब्द मी माझ्या मनी रुजवून घेतले आहेत.
    त्यांनीच मला शरद तांदळे सरांचं द आंत्रप्रेन्युअर हे पुस्तक आवर्जून वाचण्यास सांगितलं. त्याच बरोबर रावण राजा राक्षचांचा हे ही पुस्तक वाचायला सांगितलं. मी ही विचार केला की, एकदा तरी ही पुस्तकं वाचूनच पहावी. मी त्यांना दोन्ही पुस्तकांची ऑर्डर दिली. त्यांनी मला ही दोन्ही पुस्तकं घरपोच मिळवून दिली. ती पुस्तकं वाचून मी खूप प्रेरित झालो.द आंत्रप्रेन्युअर या पुस्तकांतून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे. या पुस्तकातून शरद तांदळे सरांचे मला आवडलेले काही विचार:

    • आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला लवचिक आणि नम्र होता आलं पाहिजे…!
    • या जगात तुमचं नैराश्य समजून घ्यायला कुणालाही वेळ नसतो. कारण इथे फक्त यशाची भाषा चालते…!
    • Opportunity dance with those who are already on the dance floor…!
    • चांगला उद्योजक व्हायचं असेल तर बचतीची सवय पाहिजेच. बचत खात्यात पैसे नसतील तर निष्काळजीपणाचं हे सर्वात मोठं लक्षण आहे…!
    • तुमच्या अंगी नम्रता नसेल तर तुम्ही शून्य आहात. हसतमुख चेहऱ्यावरील नम्रतेने जग जिंकता येतं…!
    • जर माझ्यासारखा एक सामान्य मुलगा लढू शकतो, तर कुणीही लढू शकतं व आयुष्यात हवं ते मिळवू शकतं. मनातील प्रत्येक जाणिवेला एक गोष्ट सतत सांगत राहा मला जगायचंय… Larger Than Life…!
  4. अजय बि. बेठे
    आधीच रावण राजा राक्षसांचा वाचून झालं होतं. रावण समजला होता. रावण राजा राक्षसांचा या पुस्तकाने तर वाचकांच्या मनावर राज्य केलं.
    त्यानंतर आता द आंत्रप्रेन्युअर आलं असं समजलं होतं. वाचायला खूप उत्सुक होतो. कारण आधीच सरांचं स्ट्रगल भाषण ऐकून प्रभावित झालो होतो. त्यात महाराष्ट्राच्या मातीतल्या उद्योजकाला थेट लंडन मध्ये पुरस्कार मिळालंय म्हणजे भारीच राव…!
    पुस्तकाचं कव्हर पेज बघितल्यावर वाटलं पुस्तक बहुदा फक्त नव उद्योजकांसाठी असेल. यात उद्योग कसा करायचा, भांडवल कुठून मिळवायचं, स्टार्टअप कसा सुरु करावा, आन त्यासाठी वाटेत येणाऱ्या अडचणी..
    अशा सगळ्या गोष्टींचं उत्तर यात असेल असं वाटलं.
    पण पुस्तक वाचायला सुरुवात केली. ६०-७० पानं वाचून झाल्यावर कळायला लागलं की “ये तो साला अपने फिल्म का ट्रेलर हैं” कारण माझ्या आयुष्यात सुद्धा नेमके तसंच होत आहे. फक्त इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही. कारण त्यात जाणाऱ्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना शिव्यांचा प्रसाद देत बाहेर खेचणारा मी होतो. बहुतेक सगळ्याच वाचकांना वाचल्यावर सेम फिलिंग येईलच, कारण ते वयच त्या गोष्टींसाठी असत. यात “सो कॉल्ड हुशार” पहिल्या बाकावरची मूळ मोडत नाही.
    अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य होतं,
    “The best brains of the nation may be found on the last benches of the classroom.”
    यालाच प्रेरित होऊन मी माझे दोन मित्र आम्ही मागच्या बाकावर बसून स्वतःला हुशार समजण्याचा मोठा गैरसमज करायचो.
    पुस्तक पुढं पुढं वाचत गेल्यावर कळतं की हीच योग्य वेळ आहे घाणीच्या दलदलीतून बाहेर पडण्याची. पण मित्र मंडळी असतातच तरबेज त्यात पुन्हा खेचायला. पण योग्य पुस्तक हाती आलंय असं वाटतं. पेज नं. १०१ वर मैत्रीचं उदाहरण हे मनाला लागून जातं. कारण मला माझे ३-४ मित्र नेहमी म्हणायचे “भाई तेरे लिए तो जान भी हाजिर हैं”, तेव्हा थोडा फार विश्वास होता की सुख दुःखात साथ असेल पण वाचल्यावर कळलं की नाही सगळा अफवाचा बाजार असतो हा..
    कॉलेज वयात असताना तरुणांमध्ये एक कन्हैय्या कुमार घुसतो, तसाच माझ्यामध्येही तो एकांतात असल्यावर यायचा. मला सुद्धा वाटायचं की आपल्यावर अन्याय झाला. आंदोलन करावं लागेल, सिस्टीम बरोबर नाही, तिला बरोबर करावं लागेल. नशिबाने तो कधी जागा झाला नाही.
    जेव्हा यशाचं आपण एकच दार ठोठावत असतो, तेव्हा आपल्याला बाकीची दारं दिसत नाहीत. ते शोधावे लागतात, मार्ग काढावे लागतात. उत्स्फूर्त युवा हा युवा उद्योजक होऊच शकत नाही. हा तेव्हाच होतो, जेव्हा स्वतः च्या मेहेनतीवर अवघड मार्गातून वाट काढत फुलपाखरासारखं स्वतःचा कंफर्ट झोन तोडून स्वतः च्या जिद्दी वर आयुष्याची सुरुवात करतो. व्यवसाय हा दुसऱ्याला बघून केलेला चालत नाही, अन त्याला यश सुद्धा प्राप्त होत नाही. साखरेची गोडी ही त्याला चाखल्यावरच कळते.
    तसंच आयुष्याचं आहे.
    सरांनी शून्यातून उभारलेल्या साम्राज्याला माझा सलाम व पुस्तक लिहिल्याबद्दल खूप खूप आभार..
  5. कल्याण बोरकर (लासुर, औरंगाबाद)
    शरद तांदळे सरांचं द आंत्रप्रेन्युअर हे पुस्तक १८४ पानांचं मोटिव्हेशनल पुस्तक नसून एका मोठ्या भावाने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याच्या अनुभवातून लहान भावंडांसाठी लिहिलेले एक “पत्र” आहे.
    किशोर वयापासूनच त्यांनी केलेल्या संघर्षाचा अनुभव आपल्याला सांगितला आहे. उगाच सध्याच्या मोटिवेशनल स्पीकर सारख्या मोठमोठ्या गप्पा न मारता, स्वतःच्या वैयक्तिक चुकांबद्दल, यशा-अपयश याबद्दल तत्कालीन मनस्थितीबद्दल खरं खरं लिहून घरातल्या मोठ्या भावाप्रमाणे समजावून सांगितलेलं आहे.
    खरंतर सर्वच मध्यमवर्गीय युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं. हे पुस्तक फक्त उद्योजक होण्यासाठीचं पुस्तक नाही, तर हे पुस्तक वाचून तुम्ही आज कुठं काय चुकताय हे समजतं.
    खरं तर तांदळे सरांनी सर्वच प्रकारच्या तरुणांची मानसिकता यात रेखाटली आहे. माझ्या सारख्या व्यवसायात नव्या असणाऱ्या तरुणांनी ज्यांचे व्यवसाय कोविड नंतर अडचणीत आहेत आणि या परिस्थितीमुळे मनस्थिती खचली आहे, त्यांनी तर हे पुस्तक हमखास वाचावे. कारण या पुस्तक वाचनातून सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि नवीन मार्ग शोधण्याचा दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होईल.
Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us