छ. शिवाजी महाराजांचे धोरणीपण, त्यांनी केलेली मुलुखगिरी, बलाढ्य शत्रूशी दिलेला लढा, स्वकीयांशी त्यांना करावा लागलेला संघर्ष, प्रसंगपरत्त्वे स्वकीय आणि विरोधी बाजूच्या शत्रूबाबत अंगिकारलेली क्षमाशीलतेचे धोरण हे सारेच शिवाजीराजांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचे दर्शन म. फुले या पोवाड्यामधून वाचकांना घडवतात. तसेच मातोश्री जिजाऊ यांचे संसारिक जीवन, शिवबांवर त्यांनी केलेले संस्कार आणि त्या संस्कारातून शिवबांमधील क्षात्रवृत्ती जागृत होणे व शिवाबांचे व्यक्तिमत्व साक्षात होणे हे सारे घटना-प्रसंग पोवाड्यातून पुनर्निर्मित झाले आहेत. – डॉ. विश्वनाथ शिंदे