प्रियंका सरवार

पुस्तके आणि चांगली माणसे यांची संगत मिळाली की आयुष्याच्या वळणावर आपला रस्ता विचारांच्या समृध्दतेकडे वळतो , न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसच्या परिवारात सहभागी झाल्यावर हे प्रकर्षाने जाणवले असे प्रियंका म्हणतात.

न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसच्या एक सदस्य ‘ प्रियंका सरवार ‘ यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक मध्ये झाले. नंतर त्यांनी पुण्यातील नावाजलेल्या pune institute of computer technology , पुणे या कॉलेजमधून information technology मध्ये इंजीनीरिंगची पदवी घेतली. तसेच त्यांनी ‘Public Service’ यामध्ये BA ची सुद्धा डिग्री घेतली आहे. लहानपणापासूनच पुस्तक विश्वाची आवड असल्यामुळे त्यांचे वाचन, लिखाण यावर प्रभुत्व आहे. त्यांच्या कलेतून ज्ञान, विचार द्यायचे काम त्यांच्या हातून घडत असते.

उच्च शिक्षणाची भक्कम पदवी सोबत असल्यामुळे त्यांचा computer knowledge विषयावर उत्तम अभ्यास आहे , त्याबरोबरच वाचन , लिखाण , उत्तम हस्ताक्षरामुळे कॅलिग्राफी , फोटोग्राफी ह्या सगळ्याच गोष्टींमुळे त्यांचे अष्ठपैलू व्यक्तिमत्त्व सर्वांना जवळचे वाटते.

त्यांच्या artistic nature , creative mind आणि कलात्मक गुणांचा फायदा न्यू ईरा टीमला नक्कीच होत आहे. ‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ची website पूर्ण करण्याची जबाबदारी यांच्याकडे होती,अवघ्या दोन महिन्यात ते काम पूर्णत्वाला गेले , त्याचे श्रेय प्रियंका मॅडमचे आहे. तसेच पुस्तकांचे proof reading ,content writing , social media handling हे सर्व काम त्या टीमचा भाग म्हणून करत आहे.

प्रियंका मॅडम म्हणतात , ” माझे व्यक्तिमत्व घडविण्यात माझ्या आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे. इथे आल्यावर शरद सर , अमृता मॅडम आणि इतर सर्वच व्यक्ती , लेखक , मित्र-मैत्रिणी , इतर जे न्यू ईराच्या परिवाराशी संबंधित आहे त्यांच्यामुळे मला खूप काही शिकायला मिळत आहे , माझ्या व्यक्तिमत्त्वात आणि ज्ञानात नक्कीच यांच्या सहवासामुळे भर पडत आहे यात शंका नाही , I feel grateful to be a Part of New Era publishing house Team “.

Shopping Cart
Scroll to Top
× WhatsApp Us