एक दिवस जुना इंजिनिअर मित्र भेटल्यावर धनकवडीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे त्याने काम सांगितले. कोणतेही पूर्वज्ञान नसतांना सरांनी हे काम यशस्वी करून दाखवले. या कामाचे त्यांना चार हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांना एकामागोमाग अंडरग्राऊंड केबलचे काम मिळत गेले. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क वाढत गेला आणि त्यांना अनेक कामे मिळत गेली. नंतर त्यांना लायसन्स मिळाल्यावर त्यांनी स्वत:च लहान टेंडर भरणे सुरू केले.
चार हजारची नोकरीपासून ते आज एक प्रसिद्ध उद्योजक हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. त्यामागे दिवसरात्र अखंड मेहनत होती, कष्ट होते. अवघ्या ३-४ वर्षांमध्ये पीडब्ल्यूडी, झेडपी, एमएसईबी, एमईएस या सर्व ठिकाणी अधिकृत काँट्रॅक्टर म्हणून त्याचे सध्या काम सुरू आहे. त्यांच्या कामाची दखल म्हणून लंडनच्या सभागृहात प्रिन्स चार्ल्सच्या हस्ते त्याला ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर २०१३’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. शरद सरांच्या उत्कृष्ट कामाची ही पोचपावती होती.
हे सर्व करत असतांना ‘रावण’ बद्दल पुस्तक लिहावे असे त्यांना वाटले , रावण लिहून झाल्यावर अनेक प्रकाशन संस्थेकडून रावणसाठी आलेला नकारात्मक अनुभव , अनेकांचे टोचून बोलणे , हे सर्व समोर बघतांना येणाऱ्या नवीन पिढीला , नवीन लेखकांना ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाता येऊ नये म्हणून ‘ न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’ चा उदय झाला.
येणाऱ्या पिढीला नव विचारांच्या सोबतीबरोबर नवनवीन विषयांचे ज्ञान नव्या पद्धतीने मिळावे , त्यासाठी सर नेहमी प्रयत्नशील असतात म्हणूनच ही प्रकाशन संस्था सुरू करण्यात आली. रावण ह्या स्वत:च्या पुस्तकापासून सुरू केलेला हा पुस्तकांच्या दुनियेतला प्रवास आज २० पेक्षा जास्त पुस्तकांपर्यंत पोहचला आहे.
ह्या सर्वच गोष्टी करत असतांना तरुण पिढीला ते नेहमी योग्य मार्गदर्शन करत असतात ,योग्य सल्ला देत असतात , त्यांच्या स्पष्ट खरेपणाच्या बोलण्याच्या शैलीमुळे अनेक तरुण पिढीसाठी सर आदर्श व्यक्तिमत्व झाले आहे.
सर नेहमी सगळ्यांना हेच सांगतात जे त्यांनी त्यांच्या ‘ द आंत्रप्रेन्यूअर’ पुस्तकाच्या शेवटी म्हटले आहे की , “ काय वाचावे यासाठी चांगले मित्र आणि मार्गदर्शक जोडावे लागतील. चांगले मार्गदर्शक जोडण्यासाठी मनातील मरगळ , अढी आणि न्यूनगंड बाहेर फेकून द्यावा लागेल , म्हणजेच आधी सकारात्मक व्हाव लागेल. यश कधीही मिळो , लढत रहायचे. आपल्याला चांगले जगायच आणि हसत रहायचे आहे , हसताच आले नाही तर आपण पराभूत असतो. मनातील प्रत्येक जाणिवेला एक गोष्ट सतत सांगत रहा , मला जगायच आहे .. Larger than life.”