the ultimate introduction
Our Authors
Know more about our Authors – Their background, their journey as an author & their viewpoint and their upcoming books!!
अभिषेक कुंभार
अपघात घडत असतात त्याच पद्धतीचा अपघात म्हणजे अभिषेक कुंभार यांचे लिखाण क्षेत्रातील पदार्पण होय. चौक, कट्टा, दुनियादारीतून आयुष्याला झालेल्या सुरवातीने लेखकाचे शिक्षण काही नेत्रदीपक झाले नाही पण इतर कामगिरी मात्र भुवया उंचवणारीच राहिली. त्यामुळे या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर एका पुस्तकाच्या दुकानातून कामाला सुरवात केली असता इथेच वाचनाची गोडी जडली.
अमित मरकड
"माझे प्रेमाचे प्रयोग" या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखक अमित मरकड हे एक नवीन आणि खुमासदार लेखक आहेत.
शैक्षणिक काळात स्वतःच्या चुकीच्या वागण्याने आणि काही चुकीच्या निर्णयांनी भरकटलेले अमित मरकड यांना पत्रकारितेचे शिक्षण घेताना अवांतर वाचनाची आवड लागली आणि त्यातूनच त्यांना लिखाणाची इच्छा निर्माण झाली.
चंद्रकांत झटाले
लेखक चंद्रकांत झटाले हे विदर्भातील दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे सह-संपादक. गेल्या काही वर्षांपासून ते याच दैनिकात 'मोडलेली चौकट' नावाने स्तंभलेखन करतात. यामध्ये चौकटी बाहेरच्या विषयांना त्यांच्या सडेतोड आणि धारदार लेखनशैलीत मांडतात. सद्यःस्थितीला महाराष्ट्रातील निर्भीड, ....
देवा झिंजाड
देवा झिंजाड हे नाव महाराष्ट्रात एक संवेदनशील कवी, प्रभावी निवेदक आणि हाडाचा समाजसेवक म्हणून प्रसिद्ध आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले देवा झिंजाड पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. आणि उत्तम कवी आहेत. त्यांनी आजवर जय महाराष्ट्र , झी 24 तास इ. वाहिन्यांवर कविता सादरीकरण केले आहे.तसेच ३८० हुन अधिक कार्यक्रमांचे सूत्र संचलन, ...
डॉ. दिपक जाधव
खरे तर आई-वडील दोघे ही अडाणी पण गावातील माझं पहिलं कुटुंब ज्यातील चारीच्या चारी मुलं दहावी पेक्षा जास्त शिकलेली. तेव्हापासूनच कळलं होतं परिस्थिती किंवा पुस्तक असली आणि नसली तरी ही शिकणं नेटाने सुरू राहू शकतं. जे मिळेल ते वाचणं यातूनच खरं शिकणं सुरू होतं. शिकणं आणि कमावणं दोन्ही बरोबरच चालू होतं.
गावात शेतमजुरी केली, ...
ज्ञानेश्वर जाधवर
शिक्षणाची कास धरल्यावर वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहत नाही आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले लेखक ज्ञानेश्वर जाधवर. एक ऊस तोड कामगाराचा मुलगा जो शाळेत असताना अनेकदा आपल्या आईवडिलांसोबत ऊसतोड करण्यासाठी जायचा तोच भविष्यात शिक्षणाची गोडी लागल्याने पुण्यासारख्या शहरात आला आणि तिथेच ...
डॉ. प्रकाश कोयाडे
लेखक प्रकाश कोयाडे सरांचे वडील शिक्षक असल्याने अवांतर वाचन ,लेखन आणि शिक्षणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. एमबीबीएसचे कठीण शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप आणि जॉब करण्याऐवजी प्रकाश यांनीं त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून रुंजी घालत असलेली "प्रतिपश्चंद्र" ही रहस्यमय कादंबरी लिहायला घेतली. त्यानंतरचे जवळपास ...
गणेश बर्गे
आपल्याकडे दहावी नापास मुलाला काय - काय काम करावं लागू शकतं याचा अंदाज लेखक गणेश बर्गे यांच्या आजवरच्या प्रवासाकडे पाहून लावता येईल. एक वर्ष मिठाईच्या बॉक्स कंपनीत पडेल ते काम करण्यापासून, तीन वर्षे ट्रकवर क्लिनर म्हणून, नंतर तीन वर्षे चाळीस फुटी कंटेनरवर ड्रायव्हर म्हणून, आणि त्यानंतर पंधरा वर्षे कारवर ड्रायव्हर म्हणून आणि आता एक वर्ष शेती करण्यापर्यंत…
केतन कैलास पुरी
लहानपणी आजोबांच्या घरी अनेक पुस्तकांचा संग्रह होता, त्यामुळे वाचनाची आवड वृद्धिंगत होत गेली. इतिहासाची आवड असल्यामुळे औरंगाबाद येथील MIT College मधील इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून पुण्यातील 'डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेमधून प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व या विषयामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
मयुर रघुनाथ खोपेकर
लेखक मयुर खोपेकर सरांचे वडील गिरणी कामगार असल्यामुळे वडिलांची नोकरी गिरणी बंद पडल्यामुळे केव्हाच बंद झाली. घरातील खर्च आणि सर्व भावंडाचं शिक्षण पेलण्याचे मोठे आव्हान वडिलांसमोर होते. लहानपणापासून मयुर खोपेकर यांचा शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच जोर होता. आजूबाजूला साहित्याची कुणालाच आवड किंवा सवड नसल्यामुळे फार ...
नितीन थोरात
लेखक नितीन थोरात यांनी बीए अर्थशास्त्र ही पदवी घेतल्यानंतर लेखनाचे कौशल्य अवगत करायचे म्हणून जर्नलिझमच्या डिप्लोमाला अॅडमिशन घेतले. एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांनी लोकमत आणि पुढारी वृत्तपत्रामध्ये तीन वर्षे उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नलिझमची डिग्री घेऊन त्यांनी सात वर्षे सकाळ वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले.
विकास गोडगे
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लहान खेडेगावात सरांचे बालपण गेलं आणि वडीलांच्या नोकरीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील निमशहरी गावात माध्यमिक शिक्षण झालं. त्यांचे वडील साखर कामगार परंतु शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी. साखर कारखाना आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी बालपण आणि तरुणपण गेल्याने नव्वदच्या दशकातील गाव तसेच ...
विशाल विजय गरड
पुस्तक लेखन :
१) विविध विषयांवरील कवितांचा संग्रह असलेला 'ह्रदयांकित' हा काव्यसंग्रह दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजी आई वडिलांच्या शुभहस्ते प्रकाशित.
२) वास्तव ग्रामीण लघुकथांचा संग्रह असलेले 'रिंदगुड' हे पुस्तक दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ रोजी शेतकऱ्याच्या शुभहस्ते प्रकाशित.
३) व्याख्यानांची रोजनिशी असलेले 'मुलूखगिरी' हे पुस्तक दिनांक १४ जून २०१९ रोजी ...